
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील पांडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.ही घटना सोमवारी उघडकीस आली वनविभागाचे पथक घटनास्थळावर पोचले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखाद्या पट्टेरी वाघांच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
सावंतवाडी तालुक्यातील दाणोली-बांदा रस्त्यावरील सरमळे दाभिल येथून सात आठ किलोमीटर जंगलात सात बाव या पाडवकालीन विहिरी असे दाभिल गावचे देवस्थान आहे.हा परिसर पूर्णता जंगलाने वेढलेला आहे.
मुख्य रस्त्यावरून घटनास्थळावर पायी जाण्यासाठी किमान तीन ते साडेतीन तास चालत जावे लागते या ठिकाणी रविवारी रान माणूस प्रसाद गावडे व दाभिल गावातील सचिन घाडी हे पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांना या ठिकाणी उग्र अशी दुर्गंधी येऊ लागली म्हणून विहिरीत जाऊन पहिले असता पट्टेरी वाघ दिसून आला त्यामुळे त्यानी रविवारी सायंकाळी गावात आल्यानंतर सोमवारी सकाळी वनविभागाला माहिती दिली.