
मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
करोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्याने मुंबईतील दुकाने आणि आस्थापना आज, मंगळवारपासून आठवडय़ाचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधाची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील.
राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी नवे आदेश जारी केले. मुंबईचा गेल्या दोन आठवडय़ांतील संसर्ग दर (पॉझिटिव्हटी रेट) १.७६ टक्के, तर प्राणवायू खाटांच्या व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका आहे.
www.konkantoday.com