
खासदार संभाजीराजेंनी केली चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी
खासदार श्रीमंत संभाजीराजे यांनी पूरग्रस्त चिपळूण शहराला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी मदतीचे वाटपही केले. आपत्तीग्रस्त भागाची भेट देऊन मदतकार्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. खा. संभाजीराजे चिपळूण शहरात आले. त्यांनी शहरातील विविध भागात जावून पुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. चिपळूण बाजारपेठेत काही व्यापार्यांशी चर्चा केली.
www.konkantoday.com