*मच्छिमार बोटीवर काम करणार्‍या ठकसेनाला अटक

मच्छिमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावू ५ लाख ४० हजार रुपये घेवून फसवणूक करणार्‍या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दीपक बाबू तांडेल असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ मार्च ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रत्नागिरीत घडली होती. रत्नागिरी शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नासीर अब्दुल गनी वाघू यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणातील संशयित दीपक तांडेल याला २०२३-२४ वर्षासाठी मच्छिमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावू ५ लाख ४० हजाराची रक्कम वाघू यांनी दिली होती. मात्र संशयित स्वतः व इतर कामगार यांच्यासह कामावर आले नाहीत. तसेच दिलेली रक्कम ही परत न करता फसवणूक केली.या प्रकरणी नासीर वाघू यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयित दीपक तांडेल याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button