
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, उपचारानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
www.konkantoday.com