
रत्नागिरी तालुका अधिवक्ता परिषदेच्या अध्यक्षपदी मनोहर जैन यांची निवड
रत्नागिरी – तालुका अधिवक्ता परिषदेच्या अध्यक्षपदी अॅड. मनोहर जैन यांची निवड करण्यात आली आहे. आज याची घोषणा परिषदेच्या कोकण प्रांताचे सरचिटणीस आनंद नायक यांनी केली.
गोगटे कॉलेजच्या केळकर सेमिनार हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमात नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या वेळी अधिवक्ता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाऊ शेट्ये, उपाध्यक्ष अॅड. प्रिया लोवलेकर, उपाध्यक्ष अॅड. श्रीरंग भावे, सरचिटणीस अॅड. मिलिंद जाडकर आणि चिटणीस अॅड. संदेश शहाणे यांनी कार्यकारिणीचे अभिनंदन केले. या वेळी अॅड. शेट्ये यांनी सांगितले, जिल्ह्यात ८ न्यायालये असून त्या प्रत्येक ठिकाणी अधिवक्ता परिषदेच्या तालुका शाखा स्थापन करण्यात येणार आहेत.
नूतन कार्यकारिणी अशी– अध्यक्ष- अॅड. मनोहर जैन, उपाध्यक्ष अॅड. अजित वायकूळ, उपाध्यक्ष अॅड. अश्विनी आगाशे, चिटणीस अॅड. योगेश खाडिलकर, कोषाध्यक्ष अॅड. सौ. मृणाल पोतनीस, सहसचिव अॅड. अवधूत कळंबटे, सहसचिव अॅड. सोनाली रहाटे, सदस्य- अॅड. श्रीकांत पेडणेकर, अॅड. नीलेश घैसास, अॅड. सौ. मानसी डिंगणकर, अॅड. सौ. मीरा देसाई, अॅड. योगेश चंदगडकर, अॅड. अमित आठवले, अॅड. रत्नदीप चाचले आणि अॅड. दिलीप आठवले.यांची निवड झाली आहे
www.konkantoday.com