महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्टला दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती समोर आली होती. बारावीचा निकाल कधी लागणार याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली. “महत्त्वाची सूचना: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!”, असे ट्विट करत वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
www.konkantoday.com