मंगळवार पर्यंत लहान चारचाकी एकेरी वाहतूक सुरू होण्याची चिन्हेखचलेल्या भागाच्या विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू , आंबा घाटात
अतिवृष्टीमुळे दरडी व रस्ता खचल्याने बंद असलेला रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट गेले दहा दिवस झाले तरीही अजून बंदच आहे. दरडी बाजूला करण्याचे काम बाजूला झालेलं आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मंगळवार पर्यंत लहान चारचाकी एकेरी वाहतूक सुरू होण्याची चिन्हे असल्याची शक्यता आहे.
हा घाट बंद असल्याने वाहतूकदारांना माेठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.
www.konkantoday.com