नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांबा, १५ ऑगेस्ट च्या उपोषण ला सर्व स्तरावरून वाढता पाठींबा
नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसना संगमेश्वररोड* स्थानकावर थांबा मिळण्यासाठी *संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांनी एकजुटीने आयोजित केलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सर्व स्तरातून प्रतिसाद वाढत आहे. निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण या फेसबुक समूहातर्फे समूहप्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि सहकारी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून *एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
या सनदशीर आंदोलनाला संगमेश्वर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना, ग्रामविकास मंडळे* व तालुक्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. कोकण रेल्वे प्रत्येक वेळी विविध रेल्वे आरक्षणाचे कोटे दाखवून संगमेश्वर स्थानकासाठी तिकीट आरक्षण संख्या कमी असल्याचा दावा करत आहे. या स्थानकात एकूण अप–डाऊन अशा दहा गाड्या थांबतात. पण काही गाड्या अवेळी येत असल्याने प्रवाशांना आपल्या गावात जाण्या–येण्यास त्रास होतो आणि गैरसोयीचे ठरते मन:स्ताप आणि आर्थिक भुर्दंडामुळेशेकडो प्रवासी त्रस्त आहेत. नेत्रावती आणि मत्स्यगंधा या दोन गाड्या दिवसाउजेडी येत असल्याने त्या प्रवाशांना सोयीच्या ठरतील. त्यामुळे तमाम संगमेश्वर तालुक्यातील कोकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समूह प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी दिली. उपोषणाच्या ठिकाणी कोविड संदर्भात सर्व नियम पाळले जातील, पण त्या दिवशी उपोषणास काही गाल बोट लागले व करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला कोकण रेल्वेच जबाबदार असेल, असा इशारा जिमन यांनी दिला आहे व तशी कल्पना या आधीच कोकण रेल्वे प्रशासन आणि सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांना १५ ऑगस्ट च्या उपोषण च्या पत्रात लेखी स्वरूपात कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. या उपोषण आंदोलनात पत्रकार संदेश जिमन यांच्यासह संतोष कांबळे, दीपक पवार, जगदीश कदम, गणपत दाभोळकर, मुकुंद सनगरे, वसंत घडशी, शांताराम टोपरे, संजय म्हापुसकर,राकेश जिमन अलपेश सोलकर सचिन झिमन दीपक गुरव चंद्रकांत भेकरे आदी सहभाग घेणार आहेत.
www.konkantoday.com