
यंदा अजूनही मच्छिमारी नव्या हंगामाच्या मुहुर्ताला प्रतिकूल वातावरण.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नारळी पौर्णिमेमुळे समुद्राला आलेले उधाण, अजस्त्र लाटा आणि सोसाट्याचा वारा यामुळे मासेमारीच्या यंदाच्या नव्या हंगामाच्या मुहूर्ताला मच्छिमारांना फटका बसला आहे. असलेले प्रतिकूल वातावरण बदलण्याची मच्छीमार बांधवांना प्रतिक्षा आहे. त्यामुळे साखरीनाटे बंदरामध्ये शुकशुकाट दिसत आहे.राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवर जिल्ह्यातील महत्वाचे साखरीनाटे बंदर असून दर दिवशी मच्छिमारीमधून मोठी उलाढाल होते. याठिकाणी सुमारे पंचवीस पर्सनेट, दीडशे ते दोनशे फिशिंग ट्रॉलर, शंभर यांत्रिक होड्या असे मिळून तीनशेहून अधिक नौका मच्छीमारी करतात. यंदाचा मच्छीमारी बंदीचा काळ ३१ जुलैला संपला असतानाच आता नव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. मात्र नव्या हंगामाच्या मुहूर्तालाच प्रतिकूल हवामानाचा फटका मच्छीमारांना बसला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांमध्ये फारशी उलाढाल झालेली नाही.www.konkantoday.com




