
चिपळूण काविळतळी येथिल काही समाज कंटाकांनी मदत करणाऱ्यावरच केला प्राणघातक हल्ला तिघांविरोधात तक्रार दाखल
चिपळूण प्रतिनिधी-नुकत्याच चिपळूण तालुक्यात पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांचे अन्न धान्य, कपडालत्ता, भांडी वाहून गेली
त्यामुळे यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येत आहे. मात्र अश्याच पूरग्रत भागात मदत करायला गेलेल्या उमलती पृथ्वी फाउंडेशनच्या माध्यमातून चिपळूण येथे मदत घेऊन गेलेल्या सादिक नायकोडी यांच्यावर प्राण घातक हल्ला करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची लेखी तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात देण्यात अली आहे.
अनेक संस्थाप्रामाणे उमलती पृथ्वी फाउंडेशनच्या माध्यमातून चिपळूण कावीळतळी येथे मदत घेऊन गेलेल्या सदस्यां पैकी सादिक नायकोडी यांना शाहिद इकबाल काझी, आसिर शाहिद काझी, इकबाल शमशीद्दीम काझी यांच्या कडून प्राणघातक हल्ला करत, शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्याची लेखी तक्रार उमलती पृथ्वी फाउंडेशनच्या माध्यमातून चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मदतीचा हात देयला गेलेल्या माणसांवर 3/4 जन एकत्र येत प्राणघातक हल्ला करतात त्याचा उमलती पृथ्वी फाऊंडेशनने निषेध केला असूण पोलिसांनी त्वरित तपास करून अश्या सामाज कंटकांना अटक करण्याची मागणी केली आहे. सद्या सादिक नायकोडी यांच्यावर मिरज येथिल खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com