गृहनिर्माण संस्थान साठी स्पर्धा “स्वरूप सहकार पुरस्कारा चे होणार वितरण, १२ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव स्वीकारणार;- अँड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन हा एक महत्त्वपूर्ण विषय बनला आहे. गृहनिर्माण संस्था ही व्यापक अर्थाने कुटुंब या दृष्टीने मानसिकता विकसित होणे आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांची हिशेबी पद्धती, रेकॉर्ड, बिलिंग, कायदेशीर दस्तऐवज, व्यवस्थापक मंडळ, सभा, इतिवृत्त, संस्थेअंतर्गत चालणारे उपक्रम आणि सर्वात महत्वाचे संस्थेची इमारत असलेली जमीन संस्थेच्या मालकीची करण्यासाठी कन्व्हेअन्स डीड नोंदणीकृत झाले आहे का ? या विविध मुद्द्यांवर एक अहवाल पुरस्कार प्रक्रीयेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या गृहनिर्माण संस्थेने पाठवावयचा आहे.
१) सन २०२०-२१ ताळेबंद व आर्थिक पत्रक
२) सन २०२०-२१ मध्ये संस्थेत झालेल्या उपक्रमांची माहिती
३) लेखापरिक्षण झाले असल्यास लेखापरिक्षकाच्या दाखल्याची प्रत
४) व्यवस्थापक मंडळाची यादी.
५) कोणते कायदेशीर दस्त ऐवज ठेवले आहेत त्यांची यादी.
६) कन्व्हेअन्स डीड झाले असल्यास त्या संदर्भात संस्थेच्या अध्यक्ष / सेक्रेटरीचा दाखला.
७) संस्थेत संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक व पत्ता तसेच सभासद संख्या
८) मासिक वर्गणी व अन्य रक्कमांची थकबाकी आहे की सर्व सभासद नियमित आहेत.
९) सर्व सभासदांचे नॉमिनेशन नोंदवले आहे का ? याबाबत माहिती

अशा पद्धतीचा एक अहवाल तयार करून ॲड.दीपक पटवर्धन अध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी, प्रेसिडेन्सी हाऊस, एस.टी. स्टँड समोर, ता.जि. रत्नागिरी येथे दि.१२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावा. हा अहवाल या मेल वरही पाठवू शकता advdeepakpatwardhan@gmail.com दि.१२ ऑगस्ट २०२१ पर्यंत प्राप्त अहवालांची छाननी केली जाईल व त्यातून पुरस्कारा साठी संस्थांची निवड केली जाईल. दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी वितरित केले जातील.
गृहनिर्माण संस्थानि आपले अहवाल अध्यक्ष/ सेक्रेटरी च्या सही आणि संस्थेच्या सील सह १३ ऑगस्ट पर्यंत पाठवून पहिल्या वाहिल्या स्वरूप सहकार पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अँड दीपक पटवर्धन महासंघ अध्यक्ष यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button