इंजिन बंद पडल्याने मच्छिमार बोटीला धोका, दुर्घटना टळली, खलाशांचे जीव वाचले
बंदी कालावधीत संपुष्टात आल्यामुळे अनेक मच्छिमार धोका पत्करून समुद्रावर जातआहेत. पहिल्याच दिवशी दुर्घटना घडता, घडता टळली. साखरतर येथील एका नौकेचे इंजिन दहा वावात अचानक बंद पडले. एकीकडे खवळलेला समुद्र आणि दुसरीकडे वेगवान वारा या कचाट्यात सापडलेली नौका सावरत सावरत वरवडे किनार्यावर लागली. सुदैवाने धोक्यात गेलेल्या नऊ खलाशांचा जीव वाचला.
वातावरण बिघडल्यामुळे किनार्यावर वेगाने वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून पाण्यालाही प्रचंड करंट आहे. या परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून मच्छिमार समुद्रात जात आहेत.
www.konkantoday.com