
आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५ लाख ८३ हजार ३२ जणांना कोविड प्रतिबंधक लस
राज्यात शनिवारी दिवसभरात ५ लाख ७३ हजार ६९८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ४५ लाख ८३ हजार ३२ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी १७ लाख ९७ हजार ४८३ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ६ लाख ६५ हजार ३१४ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८१ लाख ७३ हजार ६८९ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ८४ लाख २९ हजार ४११ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
www.konkantoday.com