
दापोली तालुक्यातील तेरा जनावरांना लम्पीची लागण
दापोली तालुक्यातील जनावरांना लम्पीची लागण झाली आहे
तालुक्यातील तेरा जनावरांना पुन्हा लम्पीची लागण झाली आहे.त्यातील आठ गुरे उपचारास प्रतिसाद देऊन बरी होत आली असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.मुकुंद लोंढे यांनी दिली
यात एका भटक्या वासराचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.गिम्हवणे आणि शिरशेश्वर हातीप परीसरातील ही गुरे आहेत.
दापोली शहरासह लगत असणाऱ्या गिम्हवणे, जालगाव मार्गावर अशा अनेक ठिकाणी भटक्या गुरांचा मोठा वावर असून यात गिम्हवणे येथे एका भटक्या वासराला लम्पीचा आजार झाला असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com