संस्कार नेहरू युवा मंडळ झरेवाडीच्या नियोजनातून ४० युवकांचा समूह चिपळूण पूरग्रस्त भागात श्रमदानासाठी सरसावला
*चिपळूण येथील पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह, दलदलीने व चिखलाने माखलेल्या मुरादपुर आणि पेठमाप येथील ०२ शाळांना मोकळा श्वास देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न.
*हाय प्रेशर फवारणीचे पंप, पुरेशी फावडी- घमेली, हंडे, बादल्या, फुसण्यासाठी कापडे अशा संपूर्ण पूर्वनियोजित कामामुळे अवघ्या ०८ तासांमध्ये दोन शाळांमध्ये यशस्वी श्रमदान, या कामकाजाचे दोन्ही शाळांच्या व्यवस्थापन समितीने कौतुक आभार व धन्यवाद मानले. *श्रमदानासाठी गजानन शेठ कळंबटे यांनी प्रवासासाठी ट्रक उपलब्ध करून दिला, ओमकार (बबलू) आचरेकर यांनी संपूर्ण टीमसाठी अल्पोपहार आणि पुरेश्या पाणी बॉटल दिल्या. तर मोरेश्वर कळंबटे आणि दीपक भागवत यांनी हाय प्रेशर फवारणीचे पंप उपलब्ध करून दिले,ज्यामुळे काम गतिमान झाले. जय हो ग्रुप मावळत वठार यांनी मास्क व सॅनिटायझर व्यवस्था केली, तर मंगलमूर्ती महिला मंडळ, आशिष गावडे , अविनाश गोताड, प्रथमेश गोताड, मंदार सनगरे, सुभाष कळंबटे, अवधूत कळंबटे व सुधीर जोशी यांनी आर्थिक मदत केली या सर्व सहकार्यामुळे हे काम शक्य झाले. सर्वांचे मंडळाच्या वतीने आभार.
*मित्रांनो पूरग्रस्त भागामध्ये इतर मदत खूप जात आहे. पण या मदती सोबत श्रमदानाची ही खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, त्यामुळे आम्ही आवाहन करतो की, ज्यांना शक्य असेल त्यांनी पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन श्रमदान करावे
www.konkantoday.com