लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी रत्नागिरीत टिळकांना अभिवादन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या 101 व्या पुण्यतिथी दिनी येथील त्यांचे जन्मस्थान असणाऱ्या घरी शासनातर्फे अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज देखील फडकविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या हस्ते टिळक स्मारक या लोकमान्यांच्या टिळक आळीतील निवासात मेघडंबरीतील पूर्णाकृती पुतळयास पुष्पाजंली अर्पण करण्यात आली.
टिळकांचे जन्मस्थान असणारे हे निवासस्थान आता भारतीय पुरातत्व संरक्षण खात्यातर्फे टिळक स्मारक म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी सकाळी भेट देऊन तेथील सर्व व्यवस्थेबाबत चर्चा केली. या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या वस्तू तसेच त्यांनी काढलेल्या दैनिक केसरी वृत्तपत्राच्या तसेच गीता रहस्याचे हस्तलिखित आणि टिळकांचा जीवनपट दाखविणाऱ्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत.
या स्मृतीस्थळावर लोकमान्य टिळकांच्या सन्मानार्थ राष्ट्रध्वज फळविण्यात आला. या सोहळयास जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी, रत्नागिरीचे तहसिलदार शशिकांत जाधव, पुरातत्व विभागाचे जतन सहाय्यक बालाजी बनसोडे आदि मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com