कोरोना मुक्त गाव मोहिम अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकुण १५३४ महसुली गावांपैकी १०२८ गावात करोनाचा एकही रुग्ण नाही

रत्नागिरी जिल्हयामध्ये माझे गाव माझी जबाबदारी व कोरोना
मुक्त गाव मोहिम दिनांक १३/०६/२०२१ पासुन राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या २००० पेक्षा जास्त आहे अशा आपल्या जिल्हयामध्ये २१२ ग्रामपंचायती आहेत. या प्रत्येक गावामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या कोवीड पॉझीटीव्ह रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आली जेणे करुन कोवीड केअर सेंटर व जिल्हा रुग्णालय महिला रुग्णालय येथील लोड कमी होईल व गावातच या लोकांना उपचार मिळेल व आपल्या घरी
असल्याची जाणीव होईल. जिल्हयामध्ये एकुण २६२ विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आली.
त्याचप्रमाणे कोरोना मुक्त गाव मोहिमे अंतर्गत दिनांक १३/०६/२०२१ पासुन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नियमित टेस्टींग नियोजीत करण्यात आले व दिवसाला किती टेस्टींग घेण्यात येत आहेत. त्याप्रमाणे जिल्हयामध्ये या कालावधीमध्ये आरटिपीसीआर २३३१८ व अँन्टीजन ४३४६९ असे एकुण ६३७८७ टेस्ट करण्यात आल्या.
कोरोना मुक्त गाव मोहिमे अंतर्गत प्रत्येक गावात किती रुग्ण आहेत व ते सध्या कोठे दाखल आहेत संस्थात्मक विलगीकरणामध्ये, गृह विलगीकरणामध्ये, कोवीड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयामध्ये दाखल आहेत याची नियमित माहिती घेण्यात आली. ग्रामपंचायतीमधील ग्राम कृती दल, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी व आरोग्य स्टाफ, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात
आली.
जिल्हयामध्ये या मोहिमे अंतर्गत एकुण १५३४ महसुली गावांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यापैकी कोरोनामुक्त गावे म्हणजे आज ० रुग्ण असलेली १०२८ असुन १ ते १५ पर्यंत रुग्ण असलेली गावे ४५३ असुन, १६ ते २४ रुग्ण असलेली गावे ३२ असुन २५ पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे २६ आहेत. त्याप्रमाणे जिल्हयात अजुन देखील रुग्ण नव्याने येत असल्याने कोरोना मुक्त गाव मोहिम दिनांक १२/०७/२०२१ पर्यंत वाढवण्यात येत आहे.
जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे की आपणाला कोणतेही लक्षण असो लगेचच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कोविड केअर सेंटर मध्ये जावुन टेस्ट करुन घ्यावी व योग्य उपचारकरुन घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button