रत्नागिरी जिल्ह्यात पालकांच्या प्रतिसादामुळे शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात शासनाने कोरोना नसलेल्या गावातून शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला अवघ्या पाच शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र पालकांच्या प्रतिसादामुळे शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत १६ शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण मात्र अल्प आहे.
www.konkantoday.com