नाटे ते ठाकरे वाडी येथिल साकवाचे काम सुरू,कोकण टुडे च्या वृत्ताची दखल
(आनंद पेडणेकर )
नाटे ते ठाकरे वाडी येथिल साकवाच्या दुरावस्थेबाबत कोकण टुडे ने वृत्त प्रसिद्ध केले होते त्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे या साकवाचे काम सुरू करण्यात आले आहे जुन्या लोखंडी साकवाला गाळाने भरलेल्या नदीपात्रात तसाच कोसळून टाकण्यात आला आहे आणि नविन पुलाचे काम चालू केले गेले नदी पात्रातील उभे केलेले पिलर तसेच जुने ठेवण्यात आले ते पाण्याने गंजलेले असल्यास कालांतराने हा नविन साकव देखील धोक्यात येणार आहे कामावरती कोणाचेही नियंत्रण नाही वापरण्यात येत असलेल्या लोखंडी अँगल पूर्वीच्या अँगल पेक्षा जाडीने लहान आहेत . संपूर्ण नदी पात्राचा गाळ कधीही काढला नसल्याने नदीने पात्र सोडून वाहाते या कडेही गांभिर्याने लक्ष देण्याची ही गरज आहे या नदीत पूर्वी होडी ने मासेमारी होत होती संबंधित विभागाने या कडे दुलक्ष केल्याने आता पाणी भरण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे . ही नदी समुद्राला जिथे मिळते त्याठिकाणाचा गाळ काढणे गरजेचे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
www.konkantoday.com