
ऑकलंड येथे मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला कथ्थक नृत्य सादर करण्याचा मिळाला मान
न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मराठमोळ्या मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला कथ्थक डान्स सादर करण्याचा मान मिळाला. या महोत्सवाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे उपस्थित होते.
भारतीय वंशाच्या तसेच मूळच्या ठाणे येथील रहिवासी मात्र नोकरीच्या निमित्ताने न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर परदेशात राहून सुद्धा नामजोशी कुटुंब आपली भारतीय संस्कृती जपतय हे पाहून न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांच्यासोबत निवांत गप्पा सुद्धा मारल्या.




