कोरेची निवडणूक ४-५ ऑगस्टला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला हद्दपार करीत के. आर. सी. व रेल कामगार सेनेच्या युतीचा झेंडा फडकवा
कोकण रेल्वेच्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला हद्दपार करीत के. आर. सी. व रेल कामगार सेनेच्या युतीचा झेंडा फडकवा, असे प्रतिपादन केआरसीच नेते उमेश गावळणकर व रेल कामगार सेनेचे नेते स्वप्नील जेमशे यांनी येथे केले.
कोकण रेल्वेची निवडणूक ४ व ५ ऑगस्टला होत आहे. निवडणुकीत केआरसी एम्प्लॉईज युनियन आणि रेल कामगार सेनेने युती केली आहे. त्यांच्यासमोर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन रिंगणात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुभाष माळगी व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर सभा घेतली.
www.konkantoday.com