
ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याच्या रागातून काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्हा प्रवक्त्यांना धारेवर धरले.
चिपळूण पूरपरिस्थितीचा अंदाज व मदतीचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शहरातील परांजपे हायस्कूल येथे बैठक झाली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याच्या रागातून काही पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्हा प्रवक्त्यांना धारेवर धरले. काँग्रेसच्या या वांदगा विषयी जोरदार चर्चा सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले होते. मात्र, ते पत्रकार परिषद सोडून अचानक निघून गेले. हा प्रकार चर्चेत असतानाच आता या राडेबाजीमुळे चिपळूण काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या चिपळूण दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकाराला जिल्हा प्रवक्ते अशोक जाधव यांना जबाबदार धरल्याने वादंग निर्माण झाला
www.konkantoday.com