आस्थाच्या कार्यकर्तीने प्रश्न विचारला की पुरात तुमचे काय काय नुकसान झाले? तेव्हा सुप्रिया चा बांध फुटला ….
आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेने चिपळूण येथील पूरग्रस्त दिव्यांगांचे मदत कार्य व सर्वेक्षण करण्यासाठी काल मुरादपुर येथे भेट दिली असता अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर आली. सुप्रिया आकाश कोंडविलकर या 27 वर्षीय अस्थिव्यंग दिव्यांग महिलेच्या घरी आस्था चे कार्यकर्ते मदत कार्यासाठी व सर्वेक्षण करण्यासाठी पोहोचले. घरात वातावरण सूतकी होते. सुप्रियाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इतरच नातेवाईक देत होते. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आस्थाच्या कार्यकर्तीने प्रश्न विचारला की पुरात तुमचे काय काय नुकसान झाले? तेव्हा सुप्रिया चा बांध फुटला नातेवाईकांनी माहिती सांगितले की सुप्रियाचे पती आकाश कोंडविलकर यांनी या पुरा दोन जणांचे प्राण वाचविले परंतु नंतर दुर्दैवाने ते स्वतःचे प्राण वाचू शकले नाही. एका क्षणात सुप्रियाच्या प्रेम विवाह तून फुलेला संसार उध्वस्त झाला होत्याचं नव्हतं झालं.पती,सासूबाई व धाकट्या दिरा सोबत गुण्यागोविंदाने संसार करणाऱ्या सुप्रियाचे घरातील सर्व तर वाहून गेलेच पण त्यासोबतच तिचे पती गेले,या धक्क्यातून ती अजूनही सावरली नाहीये. महापुरात मृत्यू पावलेल्यांसाठीचा धनादेश आकाश आईने स्वीकारला परंतु त्यांचे झालेले नुकसान कधीच भरून येणारे नाही.
सुप्रियाला प्राथमिक मदत देण्यात आली. परंतु तिचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले असल्याने तिच्या आयुष्यभराच्या उदरनिर्वाहासाठी तिला नोकरी देऊन पुनर्वसन करण्यासाठी आस्था प्रशासनाकडे मागणी करणार आहे. तसेच तिला त्वरित मानसोपचार तज्ञांची देखील मदत मिळणे आवश्यक आहे.
पूरग्रस्त दिव्यांगांच्या या मदत कार्यात आस्था च्या वतीने श्रीम.सुरेखा पाथरे यांच्या नेतृत्वाखाली श्री संकेत चाळके, श्रीम. संपदा कांबळे, श्री कल्पेश साखरकर, श्रीम.अनुष्का आग्रे, श्रीमती साक्षी चाळके, श्रीम. श्रुती बापट,श्री. अभिजीत सुर्वे व चाईल्ड लाईन च्या समन्वयक अन्वी शिंदे व अवंतिका तीवरेकर सहभागी झाले होते.
www.konkantoday.com