रत्नागिरी उपप्रादेशिक कार्यालय आयएसओ मानांकनसाठी पात्र

रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत, येथील स्वच्छता आणि नीटनीटकेपणा दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात असे उपपरिवहन कार्यालय कुठेच नाही. शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात रत्नागिरी आरटीओ कार्यालय महाराष्ट्रात पहिले आले आहे. अशा या कार्यालयाला शासनाने आयएसओ मानांकन द्यावी ही मागणी आम्ही करणार असल्याचे सेवानिवृत्त परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील २० सेवानिवृत्त परिवहन आयुक्तपासून ते उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला भेट देवून पाहणी केली. ज्या रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला महाराष्ट्रातील पहिले पारितोषिक मिळाले त्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी २० सेवानिवृत्त अधिकारी आले होते. या सर्व अधिकाऱ्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले.
यावेळी आयएस सेवानिवृत्त परिवहन आयुक्त दिलीप जाधव, सेवानिवृत्त अपर परिवहन आयुक्त शिरीष ठाकूर, सतीश सहस्त्रबुध्दे, प्रसाद महाजन, एल. पी. खाडे, एस. के. पाचरणे, अमरेंद्र पाठक, जितेंद्र पाटील, संजय राउत, प्रकाश जाधव, विलास कांबळे, अशोक शिंदे, सुबोध मेडसीकर, योगेश बाग, कमलेश चव्हाण, सतीश साळवी, रुक्मणीकांत कळमणकर, राजेंद्र झेंडे, चंद्रकांत जवळकर, मारुती पाटील, मोहन जाधव आदी अधिकरी उपस्थित होते.
पूर्वीच्या काळात आरटीओ कार्यालयात फार सुविधा नव्हत्या. आता अत्याधुनिक व तंत्रज्ञानयुक्त असे कार्यालय झाले आहे, केवळ दाखवण्यासाठी नाही तर प्रत्यक्षात चांगले काम आरटीओ कार्यालयाचे आहे. कागदपत्र लावण्याची पध्दत, ऑनलाईन रिकॉर्ड या कामाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असल्याची माहिती सेवानिवृत्त परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी दिली.
या संपूर्ण सेवानिवृत्त टीमने आरटीओ कार्यालयाची पाहणी करताना उपस्थितांशी संवाद साधला. रत्नागिरी आरटीओ कार्यालयाला आयएसओ मानांकन शासनाने द्यावी अशी या २० लोकांची कमिटी करणार आहे. या कमिटीचे स्वागत मोटार ट्रेनिंग प्रशिक्षण केंद्राकडूनही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवर्धन करपे यांनी तर मनोगत व आभारप्रदर्शन सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button