गृह प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करून सदनिका हस्तांतरित न केल्याने राज्यातील एक हजार ८२६ प्रकल्पांवर कारवाई
गृह प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करून सदनिका हस्तांतरित न केल्याने राज्यातील एक हजार ८२६ प्रकल्पांतील सदनिकांची विक्री, जाहिरात व विपणन करण्यास महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) प्रतिबंध घातले आहेत. त्यामध्ये पुण्यातील सर्वाधिक सुमारे ५०० प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमधील अनेक प्रकल्प हे शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे आहेत.
विक्रीवर प्रतिबंध घातलेले प्रकल्प २०१७, २०१८ व २०१९ मध्ये पूर्ण होऊन ग्राहकांना त्यांचा ताबा मिळणे आवश्यक होते. मात्र डेटलाइन पाळली न गेल्याने ‘महारेरा’ने या सर्व प्रकल्पांना लॅब्स प्रकल्पांच्या यादीत टाकले आहे.
www.konkantoday.com