शिरगाव व अलोरे हद्दीवर बिबट्याचा धुमाकूळ ,कोंबड्या फस्त करून वासराला केले जखमी ,ग्रामस्थ भयभीत

कराड चिपळूण मार्गावरील अलोरे शिरगाव हद्दीवरील मनीष मोहिते यांच्या घराशेजारी रात्री बिबट्याने धुमाकूळ घालून कोंबड्या फस्त केल्या तर वासराला जखमी केले
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली या प्रकारानंतर वनविभागचे अधिकारी राजेंद्र शिंदे व शिरगाव पोलीस ठाण्याचे स पो नी संदीप पाटील यांनी पाहणी केली
मनीष मोहिते यांच्या घराशेजारी काल रात्रौ 1 ते 5 वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता यावेळी कोंबड्याच्या आवाजाने मनीष मोहीते जागे झाले आणि त्यांनी बिबट्याला अंगणात फिरताना पाहून त्याची बोबडी वळली त्याने आपल्या गोट्यातील गुरांना घरात बांधले आणि काही कोबड्याना वाचविण्याचा प्रयत्न केले मात्र फिसलेल्या बिबट्या समोर मनीष मोहिते घाबरून गेले त्यात बिबट्याने कोंबड्या फस्त करून एका वासराला जखमी केले याबाबतची माहिती शिरगाव तंटामुक्त अद्यक्ष विनायक शिंदे यांना दिली त्यानुसार विनायक शिंदे यांनी पाहणी केली
त्याचबरोबर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे स पो नी संदीप पाटील यांनी पाहणी करून वनविभाग अधिकारी राजेंद्र शिंदे याना माहिती दिली त्याचबरोबर शिरगाव सरपंच अनिल शिंदे ,संतोष नाचरे,विनोद सुर्वे यांनी पाहणी केली त्यानंतर वनपाल राजेंद्र शिदे यांनी पाहणी केली यावेळी माजी उपसरपंच प्रवीण सावंत ,शिरगाव सोसायटीचे संचालक बाळू शिंदे उपस्थित होते .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button