शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे निधन
देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.
देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आलेचार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात.राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, ” या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
www.konkantoday.com