राणे याना जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे पण -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने एकेरी भाषेत बोलत आहेत, त्याला जशास तसे उत्तर देण्याची आणि त्यांचे तोंड बंद करण्याची ताकद आमच्यात आहे. मात्र, आम्ही सयंमी आहोत आणि आम्हाला सयंम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इशारा दिला आहेनारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते. त्यांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पद हे एक घटनात्मक पद आहे. त्या व्यक्तीबद्दल एकेरी भाषेत बोलणे, हे राणेंसारख्या व्यक्तींना शोभत नाही. आम्ही सय्यमी आहोत आणि आम्हाला सय्यम पाळण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. म्हणूनच आम्ही शांत आहोत. नाही तर त्यांना तशाच भाषेत उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याची हिंमत आम्हा शिवसैनिकांत आहे. मी दहा वेळा सांगितले आहे, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत, की या आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, त्यांना अडचणीतून बाहेर काढा. म्हणूनच आम्ही शांत आहोत.
www.konkantoday.com