
राजापूर तालुक्यात तीनच शाळा सुरू
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले वर्षभर कुलूपबंद राहिलेल्या शाळा यावर्षीही सुरू झालेल्या नाहीत. ग्रामपंचायती वा स्थानिक प्राधिकरण यांच्या सकारात्मक ठरावाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी त्याला ग्रामपंचायतीकडून थंडा प्रतिसाद मिळाला. त्यातून तालुक्यातील भू येथील आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर, साखरीनाटे येथील न्यू मॉडर्न हायस्कूल, ताम्हाणे येथील मायमिक विद्यामंदिर अशा तीन शाळेचे कुलूप उघडले आहे.
www.konkantoday.com