
बुरंबाडच्या पर्शुराम बालविद्यालयातील नवीन वर्गखोल्या अल्पावधीतच खचल्या
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील पर्शुराम बालविद्यालय शाळा क्रमांक २ च्या वर्गखोल्या अल्पावधीतच खचल्याने मुख्य इमारतीची दुरवस्था झाली आहे. या गंभीर प्रकाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते काका लिंगायत यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नियमित पावसाला सुरूवात होण्यापूर्वी शाळेच्या वर्गखोल्यांचे काम पूर्ण करण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे वर्गखोल्या खचल्या असून स्लॅब अनेक ठिकाणी गळत आहे.
www.konkantoday.com