
पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारचा काहीसा दिलासा ,सध्या वीजबिलांची वसुली नाही
मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला असून वीजवसुली न करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत.ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे”. दरम्यान नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com