
चिपळुणात महामार्ग चौपदरीकरणातील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
चिपळूण शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण झालेल्या भागातील सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. विशेष करून गुहागर बायपास आणि पागमळा भागातील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवल्याने अनेक किरकोळ अपघात होत आहेत. येत्या मे अखेर गुहागर बायपास येथील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण न केल्यास परिसरातील नागरिकांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरातून सर्वात जास्त लांबीचा महामार्ग जात आहे. शहरातील उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.www.konkantoday.com