
महावितरणच्या सदोष कामाचा एखादा बळी गेल्यास जबाबदार कोण ? गार्ड लिंक आणि ट्रान्सफार्मर कधी बसवणार असे शिरगांवचे रहिवाशांचा सवाल
(आनंद पेडणेकर)महावितरणचे शिरगाव येथिल कार्यालय झाडगाव M I D C मध्ये आहे . या कार्यालयाचे कार्य क्षेत्र मिऱ्या , आडी , विमानतळ ‘ , साळवी स्टॉप , गोडबोले स्टॉप असा असून येथिल नागरिकांच्या समस्या कडे येथिल साहय्यक अभियंता लक्ष देत . नाहीत शिरगाव येथील अंडग्रावूड केबल असो संपूर्ण कार्य क्षेत्रात तुटलेल्या गार्डलिंकचे काम असो तसेच डीपी वरील ट्रान्सफार्मर असो अगर नविन जोडणी असो . या कार्यालयातून नविन सर्वे देताना खाजगी जागांचा उपयोग जागा मालकाशी चर्चा न करताच दिला जातो आणि लाईन टाकल्या नंतर लाईन वरती आलेली जागा मालकाला उत्पन्न देणारी झाडे बेपर्वाईने तोडली जातात त्यामुळे जागा मालकाचे नुकसान होतेय याची तक्रार संबंधीत अधिकाऱ्याकडे केली असता मी मेस्त्रीना विचारून सांगतो असे सांगतात खरं तर या अधिकाऱ्यास ग्राहकांची चिंता नाही . संपूर्ण कार्य क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ओव्हर कंडक्टरला गार्ड लिंक नाहीत या ठिकाणी ओव्हर डेड वायर तुटल्यास या तारां मधून विद्युत प्रवाह चालूं राहून शॉक लागण्याची शक्यता असते हा धोका उद्भवू नये म्हणून गार्ड लिंक जोडल्या जातात . तसेच डीपी वरील काही ट्रान्सफार्मर सदोष आहेत काम चुकार कर्मचारी याची माहिती संसंधित विभागाला देत नाहीत हे ट्रान्स फार्मर चे एक वायडींग जळल्यावर एक फेज डायरेक्ट करून विज पुरवठा केला जातोय त्यामळे थ्रि फेज वरिल मिटर ला योग्य विज पुरवठा होत नाही त्यामूळे ग्राहकांना योग्य दाबाने विज पुरवठा होत नाहीत त्याने तिन फेज वर चालणारी उपकरणे जळून ग्राहकांचे नुकसान होते याची तक्रार ह्या अभियन्त्याकडे केली असता आमच्या कडे ट्रान्सफार्मर उपलब्द नाहीत असे वारंवार सांगितले जाते महावितरण कडे गेली काही वर्ष ट्रान्सफार्मर उपलब्द नसावेत ही दुर्देवी बाब आहे . संसंधित अधिकाऱ्याची तक्रार वरिष्ठा कडे केली असता सदरचा अधिकारी त्याला स्पष्टीकरण देत नाही . महावितरणच्या सदोष कामाचा एकादा बळी गेल्यास जबाबदार कोण ? गार्ड लिंक आणि ट्रान्सफार्मर कधी बसवणार असे शिरगांव चे रहिवासी विचारत आहेत.
www.konkantoday.com