
4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार- आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये येणार आहेत.त्यात विजय वडेट्टीवार यांचंही नाव असेल. 4 जूननंतर भाजपवासी होण्याची वडेट्टीवार यांनी तयारी करावी. वडेट्टीवार जिथून निवडून येतात तिथूनच महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आम्हाला काँग्रेसमधील अदृश्यशक्तींनी मदत केलीय, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.www.konkantoday.com