
दाभोळे मार्गावर भीषण अपघात साखरपुड्यासाठी निघालेल्या मोटरसायकल वरील दोघांचा मृत्यू
लांजा दाभोळेद मार्गावर काल भीषण अपघात झाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला यातील एकाचा जागीच दुसऱ्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला
लांजा – दाभोळे मार्गावरील आसगे नजीकच्या वझर्याचा पर्यावरील पुलाजवळ घडली
लांजा तालुक्यातील गोविळ जाधववाडी येथील रहिवासी असलेले प्रकाश साबाजी जाधव (55) आणि शाम अर्जुन जाधव (50) हे तळवडे येथे असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या मोटरसायकलने गोविळ जाधववाडी येथून तळवडे येथे जात होते. दुपारी 2 च्या सुमारास लांजा – दाभोळे मार्गावरील आसगे येथील वझर्याच्या पर्यावरील पुलाजवळ एका वळणावर त्यांच्या मोटरसायकला अज्ञात वाहनाने समोरून धडक दिल्याने या धडकेत मोटरसायकल चालवणारे शाम अर्जुन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश साबाजी जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीकडे नेत असता त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होते. याचदरम्यान या मार्गावरून जाणार्या व्यक्तीने याबाबतची माहिती 108 रुग्णवाहिकेला दिल्यानंतर या रुग्णवाहिकेने दोघांनाही जखमी अवस्थेत लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते
www.konkantoday.com