अहवाल येईपर्यंत वीज जोडण्या खंडित करू नका, शासनाचे आदेश जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा
ग्रामपंचायतींच्या पथदीप व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांचा योग्य मेळ साधण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत महावितरण कंपनीने वीज जोडण्या खंडित करू नयेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
समितीचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे. त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com