अणुस्कुरा घाटामध्ये असलेले मोठमोठ्या दरडी धोकादायक स्थितीमध्ये
गेल्या काही वर्षामध्ये अतिवृष्टीमध्ये अणुस्कुरा घाटामध्ये मोठमोठ्या दगडी आणि दरडी कोसळून मार्ग बंद होण्याच्या घटना घडल्या असून या वर्षीही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी घाटातील सात ठिकाणी दरड आणि मातीसह मोठे दगड कोसळले. सद्यस्थितीमध्ये अनेक ठिकाणच्या दरडी, डोंगर परिसर आणि सुळक्यासारखे उंच असलेले मोठमोठ्या दरडी धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्या कोसळण्यापूर्वी रोखण्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास अणुस्कुरा घाटातील प्रवास असुरक्षित ठरणारा आहे.
www.konkantoday.com