थांब रे, मध्ये बोलू नको’ या चिपळूणमधील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी केला खुलासा

पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी चिपळूण दौर्यावर विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्याने नारायण राणेंचा संताप झाला होता. यावेळी एका अधिकाऱ्याला नारायण राणे झापत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर यावेळी मधे बोलू पाहणाऱ्या कार्यकर्त्याला ‘थांब रे, मध्ये बोलू नको’ असंदेखील म्हणाले होते. या संपूर्ण घटनेवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
राणे यांनी सर्वांसमोर एका अधिकाऱ्याची कानउघडणी केली. “तुमचा एकही अधिकारी येथे का नाही? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, ते रडत आहे. विरोधी पक्षाचे नेते येथे आले आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय?,” असं नारायण राणे अधिकाऱ्याला सुनावत असतानाच प्रवीण दरेकरांच्या मागे उभा एक कार्यकर्ता बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावर नारायण राणे सर्वांसमोर ‘थांब रे, मधे बोलू नको’ असं खडसावतात. यानंतर नारायण राणे पुन्हा अधिकाऱ्याला खडे बोल सुनावण्यास सुरुवात करतात. नारायण राणेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button