जुलै अखेरपर्यंत याच आठवडय़ात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता
बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जुलै अखेरपर्यंत याच आठवडय़ात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीबरोबरच बारावीची परीक्षादेखील झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
दहावी, अकरावीचा निकाल, बारावीतील ऑनलाईन अभ्यासातील परफॉर्मन्सच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या सुमारे 13.25 लाख विद्यार्थ्यांचे अंतर्गत म्ल्यूमापन ज्युनियर कॉलेजनी बोर्डाकडे सादर केले आहे. शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले, ‘निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून या आठवडय़ाच्या शेवटपर्यंत निकाल जाहीर करण्याची घोषणा केली जाऊ शकते
www.konkantoday.com