
रत्नागिरी शहरात झळकले मुख्यमंत्र्यांचे भले मोठे कट आउट.
विधानसभेचे निवडणूक तोंडावर आली असून केव्हाही आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज रत्नागिरी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शहरातील जेल रोड जयस्तंभ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भले मोठे कट आउट उभारण्यात आले आहे त्यामुळे शहरवासीयांचे त्याकडे लक्ष वेधले आहे कट आउट वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन’ असा उल्लेख असून सेवाभावी, मेहनती, कष्टाळू आणि सामान्य लोकांसाठी झटणारा असा उल्लेख आहे. या बॅनरच्या खाली शुभेच्छुक म्हणून उदय सामंत यांचे नाव आहे.रत्नागिरीमध्ये प्रथमच एवढा भला मोठा कट आउट लागला असून मुंबईतील कंपनीने हे कट आउट उभे केले असल्याचे कळत आहे एकीकडे सध्याचे शासन सामान्यांसाठी धडाधड निर्णय घेत असून आता लागलेल्या कट आउट मुळे निवडणुका आता लवकरच लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत