
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये जाऊन पाहणी व मदत केली.
चिपळूण परिसरातील पूरग्रस्त परिस्थितीत पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालां पर्यंत ते केंद्रीय मंत्र्यांपासून विरोधीपक्ष नेत्यां पर्यंत अनेक मंडळी येऊन गेली
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये जाऊन पाहणी केली. चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरश: रडू कोसळलं. ज्या ठिकाणी मदत पोहोचली नव्हती त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी मदत केली. उर्मिला मातोंडकर यांनी या कुटुंबाला रोख रक्कम देऊन मदत केली.चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं मला विश्वास आहे, परमेश्वराने या लोकांना वाचवलंय, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिलंय, माझ्या परीने ते पूर्ण करेन, अजून काय करु,
. हे सर्व घडले त्या वेळी मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवले आपण कोकणात मदत घेऊन जायचं. कोकणवासीयांना मदत करायची. कोकणातील चिपळूणची परिस्थिती खूप भीषण आहे. मात्र कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पोहोचल्यावर सांगितलं होतं.
www.konkantoday.com