
माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनी क्षेत्रात कार्यरत असलेले ४ प्रतिनिधी चिपळुणात
महापुरामुळे चिपळुणातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांनी इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई कशी मिळवली पाहिजे ? यासाठी भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनी क्षेत्रात कार्यरत असलेले ४ प्रतिनिधी चिपळुणात आले आहेत. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.मात्र, क्लेम करण्याची वेळ आली की इन्शुरन्स कंपन्या वेगवेळ्या त्रुटी कडून भरपाईची रक्कम कमी करण्याचा खटाटोप करतात, असा व्यापाऱ्यांना अनुभव आहे. यामुळे पूरग्रस्त व्यापाऱ्यांना इन्शुरन्स कंपनीकडून सरसकट भरपाई मिळावी आणि ती मिळाली पाहिजे या दृष्टीने भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी पावले उचलली आहेत यामध्ये विमा क्षेत्रातील अनुभवी प्रतिनिधी विजय चोरट, राजेश यादव, प्रकाश मिसाळ, अमित केसरकर असे चौघेजण पूरग्रस्त व्यापाऱ्यांना इन्शुरन्स क्लेम संदर्भात मार्गदर्शन करत आहेत. याचा व्यापारांना फायदा होणार आहे
www.konkantoday.com