
महापुराने चिपळूण बुडालं, राष्ट्रवादीचे नेते आहेत कुठे? शौकतभाई मुकादमाची नाराजी
चिपळूणमध्ये महापुराने सारेच उदध्वस्त झाले आहे. भाजप, शिवसेना नेते चिपळुणात पोहोचले. केंद्रीयमंत्री आले, मुख्यमंत्री आले. पण राष्ट्रवादीचा एकह नेता महापुराने उदध्वस्त झालेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी आला नाही, याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चिपळुणात २००५ मध्ये महापूर आला तेव्हा दुसर्या दिवशी शरद पवारसाहेब चिखलात उतरून व्यापारी, नागरिकांशी संवाद साधत होते. तिवरे धरणफुटीच्यावेळी पवार साहेब आले, पण आता पवार साहेब थकले आहेत. तरूण नेत्यांनी, मंत्र्यांनी आता महापुरानंतर लोकांचे अश्रू पुसण्यासाठी चिपळूण, खेडमध्ये यायला हवे होते परंतु राष्ट्रवादीचा एकही नेता अथवा मंत्री येथे आलेला नाही.
www.konkantoday.com