
सुपरफास्ट नियमात बसत नसतानादेखी प्रवाशांकडून सुपरफास्टचे शुल्क
सुपरफास्ट गाड्यांना विशेष दर आकारले जातात. मात्र रेल्वेच्या विविध क्षेत्रांमधील कोकण मार्गावर धावणार्या १४ गाड्या या नावालाच सुपरफास्ट आहेत. प्रत्यक्षात या गाड्या धीम्या गतीनेच चालविल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. सुपरफास्टच्या नावाखाली प्रवाशांकडून १५ ते ७५ रुपये आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई आणि पुण्यातील नोकरदार वर्ग गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जातो. त्यासाठी कोकणात विशेष गाड्या सोडल्या जातात. याशिवाय नियमित आणि साप्ताहिक गाड्याही कोकणासाठी सोडल्या जातात. यात सुपरफास्ट गाड्यांना अनेक प्रवासी प्राधान्य देतात. मात्र कोकण रेल्वेवरील १४ गाड्या सुपरफास्ट नियमात बसत नाहीत. तरीही प्रवाशांकडून सुपरफास्टचे शुल्क आकारले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com