शिवाजीनगर उपडाक घराच्या इमारतीला मोठ्या प्रमाणावर गळती रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील उप डाकघर इमारत समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. या इमारतीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. इमारतीत बसणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवर पावसाचे पाणी गळत असल्याची स्थिती आहे. गळतीमुळे कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे भिजून खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजीनगर येथील उपडाक घर इमारत जुनी आहे. या इमारतीला पावसाच्या पाण्याने गलती लागली आहे. मागील पंधरा दिवस शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसात या इमारतीत मोठ्या प्रमाणावर गळती होते. इमारतीच्या छताचा बहुतांश भाग हा खराब झाला आहे. यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या इमारतीत काम करणारे कर्मचारी आपल्या परीने लोकांची सेवा करत असतात. मात्र पावसामुळे होणाऱ्या गळतीचा लोकांना त्रास होत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांना गळती मुले थांबावे लागते. त्यामुळे लोकांचा वेळही वाया जातो. पोस्ट कार्यालयाच्या संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन येथे होणारी गळती थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी येथे येणाऱ्या लोकांची मागणी आहे.