विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीत सहकार्य करण्यास तयार नाहीत,व्यापाऱ्यांची नाराजी
चिपळूण तालुक्यातील व्यापार्यांचे पुरात अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना सहज विमा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासन आणि मंत्र्यांनी बैठक लावूनही विमा कंपन्या नैसर्गिक आपत्तीत सहकार्य करण्यास तयार नाहीत. पुरात विम्याचे कागद देखील वाहून गेले. अशा परिस्थितीत काही विमा कंपन्या व्यापार्यांची पिळवणूक करत आहेत. कंपन्या साधी माणुसकी दाखवत नाहीत. स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे संतप्त व्यापार्यांनी कंपन्यांना सज्जड दम भरला आहे. व्यापार्यांना नाहक त्रास देणार्या विमा कंपनीवर जिल्ह्यात बहिष्कार टाकण्याची तयारीही व्यापार्यानी केली आहे
www.konkantoday.com