
यादव चॅरिटी ट्रस्ट, मुंबईच्यावतीने चिपळुणात १९ जानेवारीपासून गवळी प्रीमिअर लीग रंगणार.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, मुंबई तालुका शाखा-चिपळूण व चिपळूण तालुका गवळी समाज बांधव यांच्यावतीने शाखेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त व स्व. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे संकुलाच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील समस्त गवळी बांधवांसाठी रविवार दि. १९ सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी गवळी प्रीमिअर लीगचे दुसरे वर्ष आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा पवनतलाव मैदान चिपळूण येथे जितेंद्र चिले, राम डिगे व संयोजन समिती यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.www.konkantoday.com