
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून गुहागर युवा शक्ती मंचच्या वतीने शहरातील मेडिकल दुकाने उशीरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी
गुहागर शहरातील मेडिकल दुकाने लवकर बंद होत असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून गुहागर युवा शक्ती मंचच्या वतीने गुहागर तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार व गुहागर केमिस्ट असोसिएशन यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील तरूणांनी एकत्रित येवून युवा शक्ती मंचाची स्थापना केली आहे. शहरात सामाजिक कार्य करणे हे या तरूणांचा मुख्य उद्देश आहे. सध्या सगळीकडेच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सुविधेची नितांत गरज आहे. या ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वणवण करावी लागते. शहरातील सर्वच मेडिकल दुकाने ही रात्रौ ८.३० वा. बंद होत असल्याने त्यानंतर कोणाला औषधे लागल्यास मोठी अडचण निर्माण होते ही दुकाने उशिरापर्यंत सुरू राहिल्यास लोकांना सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे
www.konkantoday.com