ठाकरेवाडी येथील साकव धोकादायक , साकवाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी
(आनंद पेडणेकर)१८ जुलै रोजी नाटे येथील ठाकरेवाडी जलमय झाल्यानंतर माननीय तहसीलदार राजापूर यांनी पाहणी केली होती, सध्या पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली असल्याने या ठिकाणच्या साकवाचे खरे रूप समोर आले आहे. साकवापर्यंत जाण्यासाठी असलेला दोन्ही बाजूचा बांध कित्येत वर्ष देखभाल न केल्याने सहज चालता येणे दिव्य झाले आहे. ठाकरेवाडीत ३५ आणि पडवणे येथे ६५ घरे असून येथील रहिवाश्यांचा प्रवास याच खतरनाक साकावावरून होतो.
या साकवला दोन्ही बाजूला बांबूचे तुकडे बांधून आधार दिला आहे,काही ठिकाणे टेलिफोन वायर ने लोखंडी अँगल आणि बांबूचे तुकडे बांधले आहेत. या सकवावरती टाकण्यात आलेल्या दोन फरश्यांमध्ये अर्धा फुटपेक्षा जास्त अंतर ठेवण्यात आलेले आहे.चुकून यात पादचाऱ्यांच्या पाय गेल्यास मोठा अनर्थ होईल. एकंदरीत पाहता या साकवाची पावसाळ्यापूर्वी देखभाल केलेली दिसत नाही.
ठाकरेवाडी आणि पडवणे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन साकवावरून प्रवास करावा लागतोय,तरी मा. तहसीलदार साहेब यांनी या कडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याची येथील ग्रामस्थ सांगतात.
www.konkantoday.com